स्वस्तात मस्त! इलेक्ट्रिक टूव्हीलर भारतीय बाजारात, किंमत फक्त १९,९९९ रु | Detel-India News blog

स्वस्तात मस्त! इलेक्ट्रिक टूव्हीलर भारतीय बाजारात, किंमत फक्त १९,९९९ रु

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आवाक्या बाहेर गेल्याने अनेक जण आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. केंद्र सरकारकडून सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांसाठी चांगली मदत करण्यात येत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांना अच्छे दिन आले आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीनंतर इंडियन मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी प्रचंड वाढली आहे. याला दुसरे कारण, म्हणजे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती हेही एक कारण आहे. त्यामुळे बऱ्याच ऑटो कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहने लाँच करीत आहेत. डेटेल इंडियाने भारतीय बाजारात स्वस्त किंमतीची इलेक्ट्रिक टूव्हीलर बाजारात आणली आहे. अतिशय आकर्षक देखावा आणि भक्कम इलेक्ट्रिक मोटर असलेल्या या बाईकची मोपेडची सुरुवाती किंमत फक्त १९,९९९ रुपये (+GST) आहे. कंपनीचा दावा आहे की, या इलेक्ट्रिक दुचाकीला प्रवासात प्रति किलोमीटर फक्त २० पैसे लागतील.

नवीन Detel Easy इलेक्ट्रिक मोपेड बाजारात जेट ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि मेटलिक रेड कलरसह एकूण तीन रंगांसह बाजारात उपलब्ध आहे. सामान लोड करण्यासाठी समोर बास्केट आहे. यासह मागील जागेसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याशिवाय त्यामध्ये देण्यात आलेल्या ड्रायव्हिंग सीटची उंचीसुद्धा अॅडजेस्ट केली जाऊ शकते. ग्राहक हे इलेक्ट्रिक मोपेड कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच b2badda.com वर ऑनलाइन खरेदी करू शकतात. इतकेच नव्हे तर कंपनीने बजाज फिनसर्व्हर यांच्याबरोबर भागीदारी देखील केली आहे. ज्यायोगे ग्राहकांची खरेदी आणखी सुलभ होईल, जेणेकरून ग्राहक सहजपणे मासिक हप्त्यांमध्येही या इलेक्ट्रिक मोपेडला वित्तपुरवठा करू शकतील.